माढा तालुक्यातील रस्त्यांची बिकट अवस्था; सहा टर्म आमदार असलेल्यांचे हे अपयश- खा. धैर्यशील मोहिते पाटील

प्रतिनिधी/माढा (माय मराठी न्यूज)


माढा तालुक्यातील रस्त्यांची बिकट अवस्था झालेली आहे. वाड्या वस्तीवरचा प्रवास देखील खडतर बनलेला आहे. जनतेला मुलभूत सुविधा मिळत नाही हे तालुक्याचे सहा टर्म लोकप्रतिनिधी असलेल्याचे अपयश आहे. असा टोला माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आ. बबनदादा शिंदे यांचे नाव घेता लगावला आहे. माढा तालुक्यातील मौजे दारफळ येथे जनसंपर्क दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. दारफळ येथील जनतेने लोकसभा निवडणुकीत भरभरुन मतदान केल्याबद्दल खा. धैर्यशील मोहिते- पाटील यांनी आभार व्यक्त केले.
या प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की, दारफळ व परिसरातील मुख्य प्रश्न असलेल्या बेंद ओंढ्यावरील पुलाची उंची वाढवून लवकरच प्रश्न मार्गी लावणार आहे. तसेच आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व आदरणीय विजय दादा यांच्या मार्गदर्शनपर नेतृत्वात येत्या विधानसभेला माढा तालुक्यात निश्चितच बदल घडेल यात शंका नाही असेही खा. धैर्यशिल मोहिते- पाटील शेवटी म्हणाले.
यावेळी शिवतेजसिंह मोहिते-पाटील, शिवाजी नाना कांबळे, भारत नाना पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील घाटणेकर, रामकाका मस्के, ज्योतीताई कुलकर्णी, हरिदास रणदिवे, विद्याताई शिंदे, संतोष बारबोले अमर साठे, रत्नदीप बारबोले, अशोक उबाळे, संतोष साठे, तुषार बारबोले, मोहन बारबोले, इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



