-->
विशेषसामाजिक

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृक्षारोपण

 

अकलूज/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने कै. उदयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या ६४ व्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून आदरांजली वाहण्यात आली. माळेवाडी- अकलूज येथील अंगणवाडीच्या परिसरामध्ये अकलूज नगरपरिषदेचे उपमुख्यअधिकारी जयसिंह खुळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून चांगला संदेश दिला असून वृक्षारोपणा बरोबरच वृक्षसंवर्धन होणे गरजेचे असल्याचे मत उपमुख्यअधिकारी जयसिंह खुडे यांनी व्यक्त केले. संघाच्या वतीने अंगणवाडी परिसरात केलेला वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद असून संघाच्या माध्यमातून अंगणवाडीतील समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे पर्यवेक्षिका शामल कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी भारत आगलावे, प्रा अरविंद वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त करून परिसरातील अडचणी मांडल्या. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांनी संघाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असून वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी संघ घेत असल्याचे सांगितले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भारत आगलावे, प्रा अरविंद वाघमोडे, प्रवीण गायकवाड, महेश कुलकर्णी, प्रेस संपादक व पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडबाने, शहराध्यक्ष संजय लोहकरे, अंगणवाडी पर्यवेक्षिका शामल कुलकर्णी, सेविका सुनंदा निगडी, मदतनीस रचना सोनटक्के, सुनिता खाडे, लक्ष्मी हेगडे, फुलाबाई फुगे आदी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close