-->
करमाळाराजकिय

जन्मभूमीशी असलेल तुमचं नातं मला राजकीय प्रेरणा देत; पुण्यातील कार्यकर्ता स्नेह मेळाव्यात मा.आ. पाटील यांचे प्रतिपादन

 

करमाळा/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असून जन्म भूमीशी असलेलं तुमचं नातं मला राजकीय जीवनात प्रेरणा देऊन जात असल्याचे माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी बोलून दाखवले. पुणे येथील कार्यकर्ता स्नेह मेळावा प्रसंगी ते बोलत होते. कामानिमित्त पुणे येथे असलेल्या करमाळा व कर्जत जामखेड मतदार संघातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. कर्जत-जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांचा नागरी सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमास करमाळ्याचे माजी आमदार नारायण (आबा) पाटील तसेच सौ. शितलदेवी मोहिते पाटील व प्रशांतदादा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजक तात्यासाहेब वाघमोडे, विकी देवकते, विनोद केकाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

 

पुढे बोलताना माजी आमदार नारायण आबा पाटील म्हणाले कि, करमाळा तालुक्यातील कामानिमित्त पुणे मुंबई सारख्या शहरात स्थलांतरित झालेल्या नागरिकांना भविष्यात अशी वेळ येणार नाही यासाठी गावाकडील त्यांच्या शेतीला उजनीतून पाणी व वीज या सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला एक संधी हवी आहे. शरदचंद्र पवार साहेब यांचे देशातील शेतकऱ्याच्या विकासासाठी असलेले योगदान व प्रदीर्घ अनुभवातून निर्माण झालेले त्यांचे विचार माझ्या सारख्या कार्यकर्त्याला राजकीय जीवनात खूप काही शिकवून जातात. यामुळे अशा मेळाव्यातून प्रेरणा घेऊन आपण करमाळा विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र झटत राहणार असल्याचे माजी आ. पाटील यांनी यावेळी बोलून दाखवले. या कार्यकर्ता स्नेह मेळाव्यास पुणे शहर व परिसरातील करमाळा, कर्जत जामखेड या मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली. उपस्थितीतांचे आभार तात्यासाहेब वाघमोडे यांनी मानले.

 

यावेळी व्यासपीठावर नगरसेवक गंगाधर (अण्णा) बढे, दीपक शिंदे, डॉ. गणेश राख, सभापती अतुल पाटील, उपसभापती दत्ता सरडे, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, शेखर गाडे, दीपक देशमुख, नंदकुमार शेळके, संतोष वारे, बलभीम धर्मावत, डॉ. मधूकर खेतमालस, संजय मासाळ, वंदना पाटील, सुरेश कवडे, सुरेश वारकड, बाळासाहेब गायकवाड, शिवदीप उनदरे, बाळासाहेब वाघमोडे, ॲड. विकास शिंदे, विकी दिवकते, किरण निकत, श्रीमंत शेळके, विक्रम कोपनर, सोमनाथ राख, रामदास बापू राख, अंगद रुपनवर, जयसिंग शिंदे, विक्रम खपसे, बाबुराव अडसूल, सुनील हुलगे, शिवराज पालवे, हनुमंत धालगडे, राहुल गोडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close