-->
करमाळाराजकिय

सोलापूर जिल्हा नियोजन समितीमधून करमाळा तालुक्यासाठी भरघोस निधी आणू- गणेश चिवटे

 

करमाळा/प्रतिनिधी

 

सोलापूर जिल्हा नियोजन समितीमधून करमाळा तालुक्यासाठी भविष्यात भरघोस निधी आणू. असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी चे करमाळा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांनी केले आहे. ते गुळसडी (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंत भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

 

गणेश चिवटे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) निधीतून गुळसडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंती चे बांधकाम करण्यासाठी तीन लाख रुपये निधी मंजूर केला असून या कामाचे भूमिपूजन चिवटे यांच्या हस्ते झाले.

 

या प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की, सोलापूर जिल्हा नियोजन समिती मधून आज पर्यंत करमाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामांसाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. तसेच येणाऱ्या काळात जास्तीत जास्त निधी करमाळा तालुक्यासाठी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले.

 

यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, गणेश महाडीक, विनोद महानवर, गुळसडी चे सरपंच प्रमोद भंडारे, माजी सरपंच समाधान यादव, उपसरपंच योगेश भंडारे, ग्रामपंचायत सदस्य महावीर कळसे, मारूती जाधव, आदम शेख, नारायण भोसले, पोलीस पाटील धनंजय अडसूळ, माजी उपसरपंच नवनाथ यादव, माजी सरपंच अनंत यादव, माजी ग्रा. सदस्य तानाजी खंडागळे, बापू मोहोळकर, सामाजिक कार्यकर्ते सतीश बागल, श्याम पडवळे, पप्पू बागल, राज भंडारे, शुभम लोंढे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close