करमाळा
नूतन पो. नि. ज्योतिराम गुंजवटे साहेब यांचा चिखलठाण चे सरपंच चंद्रकांत सरडे यांच्या हस्ते सत्कार

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


आज दि. ०५ सप्टेंबर रोजी करमाळा तालुक्याचे नुतन पोलिस निरीक्षक मा. श्री. ज्योतिराम गुंजवटे साहेब यांचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालय चिखलठाण (ता. करमाळा) येथे लोकनियुक्त सरपंच मा. श्री. चंद्रकांत (काका) सरडे यांच्या हस्ते करण्यात आला.
पोलिस निरीक्षक श्री गुंजवटे साहेब यांनी सर्वप्रथम चिखलठाण चे ग्रामदैवत श्री. कोटलिंग मंदिर परिसराला सदिच्छा भेट दिली. तसेच श्री. गुंजवटे साहेब हे कृषी पदवीधर असल्याने त्यांनी ग्रामस्थांशी शेतीविषयक चर्चा केली.
यावेळी सरपंच चंद्रकांत सरडे, मारुती जाधव, अशोक सरडे, महादेव पवार, अक्षय कांबळे, शुभम लगस, स्वप्निल जाडकर, हरी रोकडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



