पैलवान ग्रुप सालसे यांच्यावतीने युवा नेते यशवंत भैय्या शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील मौजे सालसे येथे आज सोमवार दि. ०५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता युवा नेते निमगाव (टें) चे सरपंच श्री. यशवंत भैय्या संजयमामा शिंदे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे आयोजन पैलवान ग्रुप, सालसे यांच्या वतीने जि.प.प्रा. शाळा सालसे येथे करण्यात आले.
याप्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त पाच दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पाच दिवस चाललेल्या विविध कार्यक्रमांच्या विजेत्यांना बक्षिस वितरणही यावेळी यशवंत भैय्या शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पैलवान ग्रुपचे अध्यक्ष सुभाष शेठ घाडगे, उपाध्यक्ष सोमनाथ शेठ सपकाळ, पैलवान ग्रुपचे मार्गदर्शक मल्ल सम्राट केसरी पै. भरत भाऊ लोकरे, गौरव शेठ घाडगे, सुरज ढेरे, रविराज सालगुडे, सुरज पवार, दिनेश सालगुडे, दिनेश लोकरे, शिवाजी लोकरे, सुरज सालगुडे व पैलवान ग्रुपचे सर्व सदस्य व कार्यकर्ते तसेच सर्व सालसे ग्रामस्थ व जेष्ठ मंडळी उपस्थित होते.



