-->
करमाळा

देलवडी परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचे ठसे दिसल्याने नागरिकांमध्ये घबराहट, वनविभागाचे काळजी घेण्याचे आवाहन.

केतुर प्रतिनिधी -उदयसिंह खाटमोडेपाटील.

दिनांक 9 सप्टेंबर रोजी देलवडी तालुका करमाळा या ठिकाणी बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे आढळून आले आहेत. त्याचं दरम्यान रात्रीच्या वेळी एका कुत्र्यावरही या हिंस्र प्राण्याने हल्ला केलेला आहे. नैसर्गिक अधिवास कमी झाल्यामुळे व करमाळा तालुक्यात असलेल्या उसाच्या मोठ्या प्रमाणातील क्षेत्र असल्याकारणाने बिबट्याला तो आधिवास योग्य वाटत असल्याने वारंवार त्याचे दर्शन या भागात आढळत आहे.आम्ही बाबासाहेब लटके वनपाल मोहोळ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माहिती दिली की सदर परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून रात्रीच्या वेळी बॅटरीचा वापर करावा, लहान मुलांना शाळेत जाताना – येताना एकट्याला न पाठवता सोबत प्रौढ मोठ्या माणसांनी जावे,आपली पाळीव जनावरे तार कंपाऊंडच्या आत मध्ये सुरक्षित ठेवावीत, आपल्या पाळीव कुत्र्याच्या गळ्यामध्ये खिळे असलेला पट्टा बांधावा.नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान कुणाला बिबट्याची काही हालचाल दिसून आल्यास खालील नंबर वरती संपर्क करावा.

बाबासाहेब लटके -९७६४०५१८५५

(वनपाल मोहोळ)

आमच्या गावातील नागरिक रात्रीच्या वेळी समूहाने गस्त घालून बिबट्या या प्राण्यापासून काही जिवीत हानी होणार नाही याची काळजी घेत आहेत, ग्रामस्थांनी घाबरून न जाता सतर्क रहावे.

रेखा सुनील ढवळे.

(सरपंच देलवडी)

About The Author

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close