-->
Uncategorized

जागतिक बांबू दिन उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी

जागतिक बांबू दिनाच्या निमित्ताने करमाळा तालुक्यातील बांबू उत्पादक शेतकरी यांचा स्नेह मेळावा मांगी येथे 18 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. हा मेळावा थेट सुजित बागल यांनी गतवर्षी बांबू लागवड केलेल्या शेतावर घेण्यात आला.

गतवर्षी करमाळा तालुक्यातील कांहीं शेतकऱ्यांनी राष्ट्रीय बांबू मिशन (NBM) अंतर्गत बांबू लागवड केली होती. त्यामध्ये बागल यांनी बलकोआ, मानवेल व न्यूटन्स या जातीची लागवड केलेली आहे. एका वर्षात या बांबूची वाढ २० ते २५ फूट झाली असून एका बुंध्यापासून एका वर्षात५ ते ७ फुटवे निघाले आहेत.

या मेळाव्यात निलकंठ अभंग सेवा निवृत्त कृषि अधिकारी कोर्टी, श्री मस्तूद व गोमे रा.साडे, संतोष घाटगे झरे, बापु काळे पिंपळवाडी, नरसाळे गुरूजी जातेगाव व बांबू लागवड करण्यासाठी उत्सुक असलेले शेतकरी उपस्थित होते.

बांबू लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले. सोलापूर जिल्ह्यासाठी कमी पाण्यावर तग धरू शकणारी मानवेल ही जात योग्य असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी बांबू लागवड जास्तीत जास्त केली तरच प्रक्रिया उद्योग उभारता करता येतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे ठरले. बांबू हा पर्यावरण समृद्ध करण्यासाठी, जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी आणि कमी श्रमात शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी बांबू लागवड करणे महत्त्वाचे आहे.

सर्व उपस्थितांचे स्वागत व आभार सुजित बागल यांनी मानले.

About The Author

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close