-->
करमाळामहिलाविषयकराजकिय

शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे व मंगेश चिवटे उद्या करमाळ्यात 

 

माय मराठी न्यूज

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासु, शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. ज्योतीताई वाघमारे व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे उद्या मंगळवार दि. १७ जुलै रोजी करमाळ्यात येत असून सकाळी ११.०० वा. त्यांच्या हस्ते ४०१ महिला बांधकाम कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये भांड्याचे देण्यात येणार आहेत. यावेळी बचत गटातून महिलांना स्वावलंबी करण्यासंदर्भात आलेल्या विविध कर्ज व अनुदानाच्या योजना संदर्भात प्रा. ज्योतीताई वाघमारे मार्गदर्शन करणार आहेत.

 

शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्यातील आतापर्यंत २६०० बांधकाम कामगारांची नोंद झाली आहे. ८५०० कामगारांची नोंद करण्याची उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले आहे. या नोंदणी धारक बांधकाम कामगारांना शासनाचे २८ फायदे दिले जात आहेत. शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी ज्योतीताई शिंदे व त्यांचे सर्व सहकारी या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

 

या कार्यक्रमासाठी बचत गट व लघुउद्योग करणाऱ्या इच्छुक महिलांनी उपस्थित राहावे. असे आवाहन उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, शहर प्रमुख संजय शीलवंत यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close