माय मराठी न्युज नेटवर्क


नाशिक मधील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका एम.डी. डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. डॉक्टर स्वप्निल शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव असून दरम्यान या प्रकरणात कॉलेजमधील दोन सीनियर मुलींकडून रॅगिंग केली जात होती. याच त्रासाला कंटाळून आपल्या मुलाचा घातपात झाल्याचा आरोप स्वप्निलच्या कुटुंबियांनी केला आहे. छळ होत असल्याबाबत ची कल्पना याअगोदर देखील कॉलेज प्रशासनाला दिली होती, मात्र या गोष्टीकडे कॉलेज प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्याचाही आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. कॉलेज प्रशासन आणि दोन सीनियर मुलींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांकडून केली जात आहे. दरम्यान याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून पुढील तपास सुरु आहे.
नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका डॉक्टरचा संशयास्पद मृत्यु झाला आहे. डॉक्टर स्वप्नील शिंदे असे या मृत डॉक्टरचे नाव असून तो गायनॅकॉलॉजीच्या दुसर्या वर्षात शिक्षण घेत होता. कॉलेजमधील काही सिनिअर मुली त्याला मुद्दाम त्रास देत होत्या. त्याचा वारंवार मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केला आहे. त्याच्याकडे आढळून आलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याने रॅगिंग करणाऱ्यांची नावेही दिली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे.
स्वप्नील महारु शिंदे मेडिकल कॉलेज येथील ऑपरेशन थिएटरच्या बाजूस असलेल्या वॉशरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यावर उपचार सुरू होते. स्वप्नील यास रात्री सुमारे १०.३० चे सुमारास डॉ. जितेंद्र खोडीलकर यांनी त्यास मयत घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद आडगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
हॉस्पिटल प्रशासनाने रॅगिंगचे आरोप फेटाळले
जे काही झाले ते वाईट झाले. स्वप्निल आमच्याकडे एम.डी च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. सप्टेंबर २०२० मध्ये त्याला डिप्रेशनचा प्रॉब्लेम असल्याचं समोर आलं होतं. त्याचे कुटुंबीय त्याला फेब्रुवारी महिन्यात घरी घेऊन गेले होते. जुलैमध्ये तो परत आला तेव्हा त्याची अशी परिस्थिती बघता आम्ही त्याच्या आईला आमच्या हॉस्टेलमध्ये त्याच्या सोबत राहण्यास परवानगी दिली. रॅगिंगबाबत ऑफिशियल त्याने किंवा त्याच्या कुटुंबियाकडून आम्हाला कधीच माहिती किंवा तक्रार देण्यात आली नाही. मुलींनी त्रास दिल्याचा जो आरोप केला जातोय, त्यानुसार आम्हीही चौकशी सुरु केली आहे. स्वप्निल नेहमी डिप्रेशनमध्ये असायचा त्याची ट्रीटमेंट देखील सुरु होती असे हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे. रॅगिंग वगैरे प्रकार नाही, असं डीन मृणाल पाटील यांनी सांगितलं आहे.




