-->
करमाळामाहिती विषयकसामाजिक

जे संघर्षावर मात करतात तेच जगाला नवी दिशा देतात- प्रा. गणेश करे पाटील

 

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)

 

जे संघर्षावर मात करतात तेच जगाला नवी दिशा देतात. असे मत यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश भाऊ करे पाटील यांनी व्यक्त केले आहे. गौंडरे (ता.करमाळा) येथील डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने तसेच गेल्या वर्षीच्या इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभा प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, जर तुमचं भविष्य उज्वल करायच असेल तर चांगली संगत आणि मनाशी मोठं ध्येय ठेवा यश तुम्हाला नक्की मिळेल.

 

यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. गणेश करे पाटील यांच्यातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक कु. श्रुती हनपुडे ३०००/- रुपये द्वितीय क्रमांक मयंक गायकवाड २०००/- रुपये तृतीय क्रमांक स्वप्निल पारेकर १०००/- रुपये आदींचा समावेश आहे. तसेच एन एम एम एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या पंचवीस गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या आई वडिलांसोबत प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन गणेश करे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी इयत्ता नववीतील विद्यार्थिनी यशश्री काळे, समीक्षा मुसळे, साक्षी करे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करून दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तर दहावी मधील विद्यार्थिनी कु. स्वामिनी कदम व आश्लेषा कदम यांनी शाळा व शिक्षक यांच्या बद्दलची कृतघ्नता व्यक्त केली. विद्यार्थी हा केंद्रभूत मानून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचं कौतुक व्हावं, म्हणून दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहित केलं जातं.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. गणेश करे पाटील यांनी स्वीकारले तर फिसरे गावचे उद्योजक भरत भाऊ अवताडे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी सुग्रीव निळ साहेब, केंद्रप्रमुख श्रीरामे सर, या प्रशालेचा माजी विद्यार्थी उद्योजक बंटी जाधव, गौंडरेचे सरपंच सुभाष नाना हनपुडे, संस्थेचे अध्यक्ष उमराव बापू रणमोडे, गौंडरेचे माजी पोलीस पाटील देविदास पाटील, रयत शिक्षण संस्थेचे भोसले सर, माजी विद्यार्थी कॉम्प्युटर इंजिनियर कृष्णा दौंड, राहुल शेळके, फक्कड तात्या पाटील यांनी प्रमुख पाहुण्याचं स्थान स्वीकारले. या कार्यक्रमासाठी गौंडरे गावातील व पंचक्रोशीतून विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे आदर्श मुख्याध्यापक श्री. सांगडे सर तसेच सहशिक्षक रणमोडे सर, जगदाळे सर, पवार सर, गायकवाड सर, नाळे सर, गोफने सर, खाडे सर, सौ. प्रा. प्रेरणा अंबारे मॅडम, नीळ सर व शिक्षकेतर कर्मचारी पोपट मांडरे व भास्कर वायकुळे या सर्वांनी प्रयत्न केले. आलेल्या सर्वांचे आभार शेवटी गोफणे सर यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close