-->
करमाळाविशेष

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त एस.एस.सी टॅलेंट सर्च परीक्षा श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये संपन्न

 

केम/प्रतिनिधी

 

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त केम येथील सागरराज तळेकर यांच्या संकल्पनेतून श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये मंगळवार दि. २३ जानेवारी रोजी एस.एस.सी टॅलेंट सर्च परीक्षा संपन्न झाली. यावेळी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण रत्नाकर तळेकर सर व गोरख खानट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन प्रशालाचे मुख्याध्यापक कदम एस. बी सर यांनी केले. तर पुष्पहार अर्पण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत तळेकर सर यांनी केले.

 

एस.एस.सी टॅलेंट सर्च परीक्षा उद्घघाटन समारंभाला उपस्थित असणारे मान्यवर शिवाजी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ तळेकर, राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज तळेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत तळेकर, उपाध्यक्ष गणेश तळेकर, गोरख खानट, रत्नाकर तळेकर सर, ए.पी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील, शिवसेना नेते श्रीहरी तळेकर, समाधान गुरव यांचा स्वागत व सत्कार तसेच एस.एस.सी टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजक सागरराज तळेकर यांचा विशेष सत्कार मुख्याध्यापक कदम एस. बी सर यांनी केला.

 

या एस.एस.सी टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये केम परिसरातील श्री उत्तरेश्वर हायस्कूल, राजेभाऊ तळेकर विद्यालय, नूतन विद्यालय, शारदाताई पवार विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close