
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


घोटी (ता. करमाळा) येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शनिवार दि. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी निमगाव (ता. माढा) येथील आमदार संजयमामा शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.
यावेळी विष्णू ननवरे (जनसेवा पार्टी प्रमुख), ओबीसी नेते धनाजी ननवरे, सोमनाथ ननवरे (ग्रामपंचायत सदस्य घोटी), प्रदीप वाघमारे (ग्रामपंचायत सदस्य घोटी), दत्तात्रय क्षीरसागर (प्रगतशील बागायतदार), सागर ननवरे, अनिल राऊत, कुंडलिक ननवरे, आजिनाथ ननवरे, नवनाथ यादव, शिवाजी कानडे, रमेश ननवरे, उमेश ननवरे, संतोष कानडे, गजेंद्र शेंडे, महेश राऊत, भालचंद्र राऊत यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.
यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केलेल्या सर्वांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. पुढील काळात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी या प्रसंगी दिले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव दादा माळी, घोटीचे सरपंच विलास राऊत, कुर्डूचे सरपंच बाळासाहेब जगताप, निंभोरेचे सरपंच रविंद्र वळेकर, बारलोणीचे माजी सरपंच संजय लोंढे, बारलोणी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ आतकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष नवले, कोर्टीचे नेते सुभाष अभंग, उपळवाटेचे युवा नेते बाळराजे माळी, कन्हेरगांवचे धनंजय मोरे, विनायक राऊत, कांतीलाल राऊत घोटी, अमोल भोसले, प्रशांत शेंडे, राजेंद्र भोसले, अक्षय खरात आदीजण उपस्थित होते.
आमदार संजयमामा शिंदे गटात नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यामुळे आमचे ही बळ वाढले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घोटी गावातून आमदार संजयमामा यांना आम्ही सर्वजण सर्वाधिक मताधिक्य देणार आहे.
श्री. विलास राऊत, सरपंच, घोटी ग्रामपंचायत.




