-->
करमाळाराजकिय

भाजपाचे गणेश चिवटे यांच्या प्रयत्नातून ९ रस्त्यासाठी ८५ लाखाचा निधी मंजूर

 

करमाळा/प्रतिनिधी

 

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील विविध ९ रस्त्यांसाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश (भाऊ) चिवटे यांच्या प्रयत्नातून ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

 

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन मधून धायखिंडी- करंजे रस्त्याच्या ७५ लाख रुपयांचा निधी चिवटे यांनी मंजूर केला आहे. यानंतर लगेच करमाळा तालुक्यातील आणखी ९ रस्त्यासाठी ८५ लाख रु निधी त्यांनी खेचून आणला आहे.

 

मंजूर झालेल्या ९ रस्त्यांमध्ये विट येथील गावडे वस्ती रस्ता १० लाख रु, कुंभेज येथील भोसले वस्ती रस्ता १० लाख रु, हिसरे व सालसे येथील दोन रस्ते २० लाख रु, बिटरगाव (श्री) येथील भोसले वस्ती बंधारा रस्ता १० लाख रु, पोथरे येथील पोटेगाव रस्ता १० लाख रु, बोरगाव रस्ता ५ लाख रु, मिरगव्हाण येथील जुने गावठाण ते पाटील वस्ती रस्ता १० लाख रु व देवळाली येथील बादाळे वस्ती रस्ता १० लाख रु. असा एकूण ८५ लाख रु. निधी चिवटे यांनी मंजूर करून आणला आहे.

 

या गावातील रस्ते वर्षानुवर्षे नादुरुस्त व खराब असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना दळणवळणासाठी खूप अडचणी निर्माण होत होत्या. आता या समस्या दूर होणार आहेत. यामुळे चिवटे यांच्या कामाचे परिसरातील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close