राजुरीच्या जिल्हा परिषद शाळेला उत्कृष्ट जिल्हास्तरीय शाळा पुरस्कार

राजुरी/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील राजुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला यावर्षीचा सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने जिल्हा जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
राजुरी जिल्हा परिषद शाळा कोर्टी (ता. करमाळा) येथील केंद्रात सर्वोत्तम शाळा म्हणून नावाजलेली आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी असलेल्या भौतिक सुविधा, संगणकीय संच, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी असलेले क्रीडांगण व क्रीडा साहित्य, सुसज्ज वर्ग खोल्या, प्रशस्त कार्यालय आणि कार्यतत्पर प्रामाणिक शिक्षक वर्ग या सर्व बाबींमुळेच आजपर्यंत राजुरी जिल्हा परिषद शाळा उत्कृष्ट राहिली आहे.
या सर्व कार्याची दखल घेऊन सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा उत्कृष्ट शाळा पुरस्कार काल अनगर ता. मोहोळ जिल्हा सोलापूर येथे सोलापूर जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजीराव गुंड व जिल्हा सोसायटीचे संचालक व शिक्षक नेते हनुमंत सरडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष पानसरे सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जाधव, सरपंच राजेंद्र भोसले यांच्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व राजुरीचे ग्रामस्थ उपस्थित होते.



