-->
करमाळासामाजिक

अर्जुननगर फाटा–मिरगव्हाण रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास

 

करमाळा/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील अर्जुननगर फाटा ते मिरगव्हाण या रस्त्यावरच्या पुलावरून वारंवार पाणी वाहत असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी अनेकदा प्रशासनाकडे लेखी व तोंडी स्वरूपात करण्यात आली, तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

 

करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण, अर्जुननगर आणि परंडा तालुक्यातील बंगाळवाडी येथील ६० पेक्षा जास्त विद्यार्थी दररोज करमाळा शहरात शिक्षणासाठी जातात. मात्र पुलावरून सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण बनले आहे. यामुळे शैक्षणिक नुकसानीबरोबरच ग्रामस्थांना दैनंदिन कामांसाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.

 

या पुलावरून सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी उंच पुल बांधण्यासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे लेखी व तोंडी तक्रार केली आहे, परंतु अद्याप कोणतेही पाऊल उचललेले नाही.

– प्रकाश थोरात, माजी सरपंच, अर्जुननगर

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close