
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा भाजपाचे नेते, सोलापूर जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश (भाऊ) चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यातील बिटरगाव (श्री) येथे आज गुरुवार दि. २६ ऑक्टोंबर पासून कीर्तन महोत्सव सुरु झाला आहे. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलशपूजन, दीपप्रज्वलन, विनापूजन, प्रतिमापूजन, टाळ- मृदूंगपूजन करून कीर्तन महोत्सवाची सुरवात करण्यात आली.
आज गुरुवार दि. २६ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प किर्तनकेसरी अक्रूर महाराज साखरे- गेवराई यांचे तसेच शुक्रवार दि. २७ रोजी ह.भ.प भागवताचार्य संदीप महाराज खंडागळे- पैठण, शनिवार दि. २८ रोजी ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील- बुलढाणा, रविवार दि. २९ रोजी समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे रात्री ९ ते ११ या वेळेत कीर्तन होणार आहे. सोमवार दि. ३० रोजी सकाळी ९:३० ते ११:३० या वेळेत ह.भ.प महंत विठ्ठल महाराज शास्त्री- गहीनाथगड यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
याशिवाय दररोज प्रवचन, शिवामृत ग्रंथ पारायण करण्यात येणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे अवाहन बिटरगाव (श्री) चे सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर व समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे.



