-->
करमाळाकृषी विषयक

कमलाभवानी शुगरकडून दिवाळीपूर्वी ऊस उत्पादकांच्या खात्यावर १०० रु हप्ता जमा होणार- चेअरमन विक्रमसिंह शिंदे

कमलाभवानी शुगर करमाळा तालुक्यातील इतर कारखान्यापेक्षा जास्त दर देणार- विक्रमसिंह शिंदे 

 

प्रतिनिधी/संजय साखरे

 

गेल्या वर्षी जानेवारी अखेर गाळप झालेल्या उसाला आतापर्यंत २३०० रुपये तर फेब्रुवारी व मार्च महिन्यात गाळप झालेल्या उसाला २४०० रुपये प्रति टन प्रमाणे दर दिला आहे. दिवाळीपूर्वी आणखी १००/- रु हप्ता देण्यात येणार आहे. तसेच येणाऱ्या गाळप हंगामात कमलाभवानी शुगरला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना करमाळा तालुक्यातील इतर कारखान्यांपेक्षा सर्वाधिक तर पहिली उचल सोलापूर जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीत देणार असल्याची घोषणा कमलाभवानी शुगरचे संस्थापक चेअरमन श्री विक्रमसिंह शिंदे यांनी केली. ते कारखान्याच्या आठव्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ प्रसंगी बोलत होते.

 

आज शनिवार दि. २१ ऑक्टोंबर रोजी कमलाभवानी साखर कारखान्याचा आठवा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा आदिनाथ सह. साखर कारखान्याचे माजी चेअरमन वामनदादा बदे यांच्या शुभहस्ते व करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रहास बापू निमगिरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

 

याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी साखर कारखानदारी अडचणीत असून कारखान्याच्या नियोजित डिस्टलरी प्रकल्प व इतर उत्पादन निर्मितीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. चालू गाळप हंगामासाठी कारखान्याकडे १४,३०० हे. आर. ऊस क्षेत्राची नोंद झाली असून यावर्षी कमलाभवानी कारखान्याचे सहा लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. या प्रसंगी वामन दादा बदे, सुजित तात्या बागल, राजेंद्र बारकुंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन वामनदादा बदे, माजी सभापती चंद्रहास बापू निमगिरे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, माजी जि.प. सदस्य नानासाहेब निळ सर, प्रगतशील बागातदार तात्या मामा सरडे, मांगी वि. का. से. सह. सोसायटीचे चेअरमन सुजित बागल, बोरगावचे माजी सरपंच विनय ननवरे, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अशपाक जमादार, गुळसडीचे माजी सरपंच मानसिंग भैया खंडागळे, कारखान्याचे संचालक समाधान भोगे, अनिल पवार, देवळालीचे उपसरपंच धनंजय शिंदे यांच्यासह ऊस उत्पादक, ऊस वाहतूकदार, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे जनरल मॅनेजर भोसले साहेब यांनी केले तर आभार मुख्य शेती अधिकारी श्री शांताराम जगदाळे साहेब यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close