
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व नाफेडच्या “भारत डाळ” योजने अंतर्गत प्रतिव्यक्ती पाच किलो प्रमाणे व प्रतिकिलो ६० रु दराने हरभरा डाळ वाटप देशभरात सुरु आहे. याचाच भाग म्हणून पोथरे (ता. करमाळा) येथे हरभरा डाळीचे वाटप सुरु असलेची माहिती भाजपचे नितीन झिंजाडे यांनी दिली.
याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, पोथरे या गावासाठी पहिल्या टप्प्यात ३ टन डाळ जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांच्यामुळे उपलब्ध झाली आहे. या प्रसंगी आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक, ग्रा.सदस्य विठ्ठल (भाऊ) शिंदे, मकाई साखर कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ झिंजाडे, पोथरेचे माजी सरपंच विष्णू रंदवे, वि.का.से. सोसायटीचे चेअरमन आबासाहेब शिंदे, यांच्या हस्ते डाळीचे वाटप करण्यात आले.
ऐन सणासुदीच्या तोंडावर बाजारभावापेक्षा कमी २५-३० रु प्रतिकिलो प्रमाणे नागरिकांचे पैसे वाचले आहेत. सर्वांना डाळ मिळेपर्यंत वाटपाचे टप्पे होणार आहेत. यामुळे पोथरेतील नागरिकांचे बरेच पैसे वाचणार आहेत. साऱ्या राज्याचा, देशाचा विचार केला तर कोटी रुपयांचा शासनाने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. सुशासन व लोकांना मदत करण्याची भूमिका यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक आभार मानत आहेत.
यावेळी आप्पा खटके, यमाजी झिंजाडे, यशवंत झिंजाडे, जालिंदर जाधव, गणेश वाळुंजकर, आबासाहेब चव्हाण, यशवंत झिंजाडे यांच्यासह भाजप पदाधिकारी व शेकडो नागरिक उपस्थित होते.



