-->
करमाळाविशेष

श्री उत्तरेश्वर विद्यालयातील ‘या’ आजी-माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

 

करमाळा/प्रतिनिधी

 

केम (ता. करमाळा) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवार दि.१९ नोव्हेंबर रोजी माजी विद्यार्थी कु. संस्कृती सतीश तळेकर या विद्यार्थ्यांनीचा एमबीबीएस ला प्रवेश आणि वैभव सतीश कोंडलकर या विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात व विशाल सतीश कोंडलकर याची भारतीय नौदलात निवड झाल्याबद्दल तसेच इयत्ता पाचवी व आठवी मधील स्कॉलरशिप पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

 

विद्यालातील माजी विद्यार्थी कु. संस्कृती सतीश तळेकर या विद्यार्थ्यांनीला एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला आहे. विशाल सतीश कोंडलकर याची भारतीय सैन्य दलात तर वैभव सतीश कोंडलकर याची भारतीय नौदलात निवड झाली आहे. तसेच विद्यालयात सध्या शिक्षण घेत असलेल्या इयत्ता पाचवी व आठवी मधील स्कॉलरशिप पात्र सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला शालेय समिती अध्यक्ष दयानंद तळेकर, शालेय समिती सदस्य संभाजी गुरव उपस्थित होते.

 

यावेळी मुख्याध्यापक कदम सर, पर्यवेक्षक सांगवे सर, शालेय समिती अध्यक्ष दयानंद तळेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. कुमारी संस्कृती तळेकर या माजी विद्यार्थिनीने एमबीबीएस ला तयारी करताना कसा अभ्यास करावा याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तसेच विशाल कोंडलकर आणि वैभव कोंडलकर यांनी भारतीय सैन्य दल व नौदल भरती विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी इयत्ता पाचवीतील नऊ व आठवीतील चार स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दयानंद तळेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.

 

या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. वाघमारे के. एन सर यांनी केले. तर सर्वांचे आभार श्री. कोंडलकर सर यांनी मानले. या सत्कार समारंभाला मुख्याध्यापक कदम एस. बी सर, पर्यवेक्षक सांगवे बी. व्ही सर, शारीरिक शिक्षण विषयाचे प्रा. अमोल तळेकर सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close