-->
करमाळाकृषी विषयक

झरे, खडकेवाडीच्या शेतकऱ्यांना लवकरच कुकडी डावा कालवा भु संपदान भरपाई मिळणार- गणेश चिवटे

 

करमाळा/प्रतिनिधी

 

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे करमाळा तालुक्यातील झरे, खडकेवाडी येथील शेतकऱ्यांना कुकडी डावा कालवा भु संपदान भरपाई लवकरच मिळणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी दिली आहे.

 

या प्रसंगी अधिक बोलताना चिवटे म्हणाले की, कुकडी डावा कालवा २४५ किमी करिता झरे व खडकेवाडी येथील शेतकऱ्यांना भु संपदान भरपाई लवकरच मिळणार आहे. यासंदर्भात खासदार निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाला आता यश आले आहे. प्रांतधिकारी प्रियांका आंबेकर यांनी यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांना तलाठी यांचेमार्फत नोटीसा बजावून अहवाल लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 

या नोटीसा झरे व खडकेवाडी येथील संबंधित शेतकऱ्यांनी झरे (दुरगुडे वस्ती) येथे उद्या बुधवार दि. ३ आक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजता येऊन घेऊन जाण्याचे आवाहन गणेश चिवटे यांनी यावेळी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close