
करमाळा/प्रतिनिधी


केंद्र सरकार व राज्य सरकार च्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड करून सर्वसामान्य जनतेचे मत जाणून घेण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) माढा लोकसभा निरिक्षक राहूल चव्हाण पाटील यांच्या मार्गदर्शनातुन संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात “होवू दे चर्चा” हे अभियान सुरू असून या अनुषंगानेच आज मंगळवार दि. ३ ऑक्टोंबर रोजी शिवसेना युवासेनेच्या वतीने हिवरे (ता. करमाळा) येथे “होवू दे चर्चा” अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, शहरप्रमुख प्रवीण कटारिया, युवा सेना तालुकाप्रमुख शंभू फरतडे यांनी मोदी सरकारकडून नऊ वर्षांत केलेल्या वेगवेगळ्या योजनांचा समाचार घेतला. यामध्ये स्विस बँकेतील काळे धन आणून प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख, अरबी समुद्रात जगातील सर्वात मोठे शिवस्मारक बांधणे, कोट्यावधी युवकांना रोजगार, महागाई कमी करण्याचे आश्वासन, महाराष्ट्रातील मोठे उद्योग, कंपन्या गुजरात राज्यात घेऊन जाणे, कंत्राटी कामगार पद्धती, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान या मुद्द्यावर लोकांना बोलते केले.
या अभियानास जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गॅस दरवाढ, इंधन दरवाढ, खतांच्या बेसुमार किमती, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत होणारी हेळसांड या विषयावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. तसेच संपूर्ण करमाळा तालुक्यात गावोगावी हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे युवासेना तालुकाप्रमुख शंभू फरतडे यांनी सांगीतले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर काका लावंड, तालुका संघटक संजय शिंदे, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर, उपशहरप्रमुख संतोष गानबोटे, पंकज परदेशी, भालेराव, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, तालुका चिटणीस उपसरपंच पांडुरंग ढाणे, शहरप्रमुख समीर परदेशी, उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, आदित्य जाधव, युवासेनेचे दिनेश पाटील, परशूराम माने, गणेश माने, विनोद पाटील, बाळराजे फरतडे, मोतीराम फरतडे, दत्ता पुजारी, आनिल शिंदे आदी उपस्थित होते.



