-->
करमाळासामाजिक

करमाळा तालुक्यातील आधुनिक भगिरथाची कहाणी; दुष्काळात प्रा. रामदास झोळ सर फाऊंडेशन पोहोचवते घरोघरी पाणी

 

माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर)

 

करमाळा तालुक्यातील नेत्यांची आपसात श्रेयवादासाठी स्पर्धा चालू असुन जनतेला मात्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये करमाळा तालुक्यात भीषण पाणी टंचाई असताना करमाळा तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याचे टॅकर प्रशासनाकडून सुरू आहेत. करमाळा तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. 

 

दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी गेल्या सहा वर्षापासून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या माध्यमातून मागेल त्या गावाला मोफत पाणी पुरवठा करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. “जे का रांजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!” या म्हणीप्रमाणे समाजसेवेला वाहुन घेऊन लोकांसाठी सदैव कार्यरत असलेले प्रा. रामदास झोळ सर खऱ्या अर्थाने करमाळा तालुक्याचे संवेदनशील, जागरूक, संकटसमयी धावून जाणारा लोकनेता म्हणून प्रभावीपणे काम करीत आहेत.

 

उन्हाळा सुरू झाला की, पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाचे टॅंकर धावू लागतात. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पाणी योजना राबवूनही टॅंकरमुक्तीच्या घोषणा फोल ठरत आहेत. उन्हाळ्यात टॅंकरची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस ती वाढतच आहे. केवळ शासकीय योजना राबवायची म्हणून कामे केली जातात. मात्र त्याचा उपयोग न होता या योजना निकामी ठरतात. अशा योजनांना कंटाळलेल्या ग्रामस्थांना करमाळा तालुक्याचे कर्तृत्व दातृत्व नेतृत्व याचा अनोखा संगम असलेले प्रा. रामदास झोळ सर स्वःखर्चांने गेली सहा वर्षे उन्हाळ्यातील चार महिने टॅंकरने पाणी पुरवठा करीत आहेत. केवळ सामाजिक भान ठेवत त्यांनी तहानलेल्याची तहान भागवण्याचे काम केले आहे. यासाठी कोणाकडून एकही रुपया न घेता हा लाखो रुपयांचा खर्च झोळ सर यांनी स्वतः हा करावयाचे ठरविले असून अविरतपणे हे काम चालू आहे. यासाठी त्यांना आई, वडील यांचे संस्कार धर्मपत्नी सौ. माया झोळ मॅडम यांचे प्रोत्साहन उपयोगी पडल्याचे प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close