-->
करमाळाराजकियसामाजिक

कुर्डवाडी MIDC बाबत सकारात्मक चर्चा; आ. संजयमामा शिंदे यांची माहिती

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

कुर्डूवाडी MIDC मधील उद्योगांना चालना देण्यासाठी आज मंत्रालयात आज उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांची दालनामध्ये भेट घेऊन कुर्डुवाडी MIDC बाबत सकारात्मक चर्चा केली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

ही चर्चा सकारात्मक स्वरुपाची झालेली असून एम आय डी सी मधील उद्योगांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावरून योग्य ते निर्देश दिले जातील असे आश्वासन उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांनी आमदार शिंदे यांना दिले आहे. त्यामुळे भविष्यकाळात कुर्डूवाडी एम आय डी सी ला चांगले दिवस येतील अशी आशा आहे.

यावेळी सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख धर्मवीर धनंजय डिकोळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक आव्हाड, चोभे पिंपरी चे सरपंच विक्रम उरमोडे, कुर्डवाडीचे सोमनाथ गवळी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close