-->
आरोग्यकरमाळाविशेषसामाजिक

विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा धडा ! नागरींकाकडून कौतुक 

 

करमाळा प्रतिनिधी 

दि. ९ (माय मराठी न्युज)

 

करमाळा तालुक्यातील हिवरे नागोबाचे  येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी यात्रा असते, जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी यात्रा संपल्यानंतर नागनाथ मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवुन आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे . 

 

हिवरे येथे श्री नागनाथ देवस्थान ची भव्य यात्रा नुकतीच संपन्न झाली मात्र, यात्रेनंतर नाराळाच्या शेंड्या, महाप्रसादाच्या पंतरवाळ्या, प्लॅस्टिक पिशव्या या मुळे परिसरात प्रचंड अस्वच्छता निर्माण झाली होती .

मुख्याध्यापक निळकंठ हनपुडे व उपक्रमशिल शिक्षक जालिंदर हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संपुर्ण मंदिर परिसरात स्वच्छता करून एक प्रकारे बेजबादार पणे वागणाऱ्यांणा स्वच्छतेचा धडा शिकवला आहे .विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समीतीकडून कौतुक होत आहे.

 

या स्वच्छता मोहीमेत विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक सुरेश शिंदे, नवनाथ खरात, सतिश सुर्यवंशी, दुधाळ गुरुजी, पल्लवी कुलकर्णी, अंकुश माने यांनी देखील सहभाग नोंदवला.

 

  आजकाल सार्वजनिक ठिकाणी वागताना नागरिकांना स्वचछेतेच महत्व समजत नाही.गावात परिसरात अस्वच्छता दुर्गंधी असेल तर रोगराई पसरते त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागावे खासकरून शाळेत व शाळा परिसरात तरी उघड्यावर थुंकणे, किंवा कचरा टाकणे टाळावे .आम्ही मंदिर परिसरात स्वच्छता करून छोटासा प्रयत्न केला आहे.

 (कु.अश्विनी दादा महानवर) 

   विद्यार्थीनी ईयत्ता ६ वी.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close