-->
करमाळाराजकियसामाजिक

मराठा बांधवावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ ग्रामपंचायात सदस्य राजेश ननवरे यांचा राजीनामा

 

 

करमाळा/प्रतिनिधी

 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी (ता. अंबड) येथे उपोषणाला बसलेल्या आंदोलनकांवर झालेल्या लाठीचार्ज चा निषेध म्हणून तसेच मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांडे यांच्या समर्थनार्थ पुनवर (ता. करमाळा) येथील युवक, ग्रामपंचायत सदस्य राजेश ननवरे यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

 

राजेश ननवरे यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा आज शनिवार दि. ९ सप्टेंबर रोजी पुनवरच्या सरपंच सौ. शैला केशव शेळके यांच्याकडे दिला आहे. मराठा आरक्षणसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा बांधव, महिला यांच्यावर अंतरवाली सराटी ता. आंबड जि. जालना येथे झालेल्या हल्याचा निषेध म्हणून ग्रामपंचायत पुनवर सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close