
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज रविवार (दि. २७ ऑगस्ट) रोजी देवळाली (ता. करमाळा) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १०४ वा ‘मन की बात’ कार्यक्रम व ‘टिफिन बैठक’ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी भाजपाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार हे उपस्थित होते. मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाला संबोधित केले.
मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाचे कौतुक करत नव्या भारतासाठी ही प्रेरणादायी मोहीम असल्याचे म्हटले. तसेच या क्षणाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची कविता देखील ऐकवली. यावेळी पंतप्रधानांनी म्हटले की, चांद्रयानाचे यश हे खूप मोठे आहे. प्रत्येक ठिकाणी चांद्रयानाची चर्चा होत आहे. यशाचा सूर्य हा चंद्रावर देखील उगवतो असं चांद्रयानाच्या यशानंतर म्हटलं जात आहे. चांद्रयान भारताचे असे स्पिरीट बनले आहे, जे कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त जिंकण्याचे ध्येय साध्य करु शकते. चांद्रयान मोहिमेतील नारीशक्तीच्या योगदानाबद्दल देखील त्यांनी भाष्य केलं. भारतातील महिला आता अंतराळाला देखील आव्हान देत आहेत. भारताच्या मुलींची महत्त्वकांक्षा इतकी वाढली आहे की, देशाचा विकास करण्यापासून त्यांना आता कोणीही थांबवू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
मन की बात कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतील पदाधिकाऱ्यांची टिफिन बैठक संपन्न झाली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन झिंजाडे व आभार प्रदर्शन ‘मन की बात’ चे तालुका संयोजक दत्तात्रय पोटे यांनी केले.
यावेळी बाळासाहेब कुंभार, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, देवळालीचे माजी सरपंच संतोष गायकवाड, उपसरपंच संदिपान कानगुडे, शहाजी बापू कानगुडे, ग्रा. सदस्य फटु कानगुडे, लक्ष्मण केकान, सोमनाथ घाडगे, नितीन झिंजाडे, सचिन गायकवाड, विष्णू रणदिवे, अमोल पवार, आजिनाथ सुरवसे, भैयाराज गोसावी, बापू मोहोळकर, सौदागर बिचीतकर, संजय कानगुडे, धर्मराज नाळे, प्रदीप ढेरे महाराज, धनंजय चोपडे, शरद कानगुडे, सचिन ढेरे, रवी पाटील, सतिश वीर, महेश झोळे, चेतन राखुंडे, नामदेव गुंड, किसन मोरे, निलेश चौधरी, हर्षद गाडे, रवी माळवे, विनोद महानवर, नितीन कानगुडे, दादा पाठक, राजेश पाटील, भरत गुंड, बजरंग मोहोळकर, संदीप काळे, शांतीलाल वलटे, पंकज बिचितकर, नाना गलांडे, नागनाथ केकान, तुकाराम भोसले, अशोक सातपुते, विशाल घाडगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



