-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

करमाळा तालुक्यातील पीक विमा सरसकट मंजूर करा; भाजपचे नितीन झिंजाडे यांची निवेदनाद्वारे मागणी

 

करमाळा/प्रतिनिधी

 

जुलै, ऑगस्ट २०२३ या महिन्यात पावसाचा सतत महिनाभर खंड पडल्याने शेतकऱ्यांची पिके जळून गेली आहेत. यामुळे पीक विमा भरून घेतलेल्या शेतकऱ्यांचे उडीद, बाजरी तूर, मूग, कांदा व इतर पिके, फळबागा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील पीक विमा सरसकट मंजूर करावा अशी मागणी भाजपचे नितीन झिंजाडे यांनी करमाळ्याचे मा. तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा फक्त १/- रु हप्त्यामध्ये भरून घेतला आहे. तसेच उर्वरित विमा रक्कम राज्य सरकारने संबंधित विमा कंपन्याना दिली आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून पीक विमा कंपन्याना खरीप २०२३ चा पीक विमा सरसकट मंजूर करावा अशी विनंती केली आहे.

 

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपविभागीय अधिकारी साहेब, माढा यांना पाठविल्या आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close