करमाळा शहरात भाजपा आयोजित ”तिरंगा बाईक रॅली” उत्साहात संपन्न

करमाळा/प्रतिनिधी


स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सालाबाद प्रमाणे याही वर्षी करमाळा शहरात भाजपाचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा बाईक रॅली उत्साहात संपन्न झाली. सलग दोन वर्षे या रॅलीचे आयोजन भाजपा च्या वतीने केले जाते. या रॅलीमुळे युवक, नागरिकांमध्ये देशाप्रती जाज्वल्य देशभक्ती जागवण्यासाठी या उपक्रमाची मोठी मदत होत आहे.
या बाईक रॅलीची सुरुवात शहरातील गायकवाड चौकातील भाजपा कार्यालय येथून झाली. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. गायकवाड चौकातून किल्ला विभाग- वेताळपेठ- फुलसौंदर चौक- मेन रोड- जय महाराष्ट्र चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक- सुभाष चौक- संगम चौकातुन पुणे रोड येथील भाजपा संपर्क कार्यालय येथे या रॅलीची सांगता झाली. शहरातील या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले.
या रॅलीत करमाळा भाजपा पदाधिकारी रामभाऊ ढाणे, जितेश कटारिया, संजय घोरपडे, बाळासाहेब कुंभार, अमोल पवार, अफसर जाधव, डॉ.अभिजित मुरूमकर, नितीन झिंजाडे, किरण शिंदे, सोमनाथ घाडगे, विनोद महानवर, विठ्ठल शिंदे, हरिभाऊ झिंजाडे, डॉ.अभिजीत मुरूमकर, मोहन शिंदे, दासाबापु बरडे, धर्मराज नाळे, जयंत काळे पाटील, बापु तनपुरे, हर्षद गाडे, मोहन शिंदे, हरि आवटे, संकेत दयाळ, कृष्णा देशपांडे, रोहित कोळेकर, दादा गाडे, दिपक गायकवाड, वसिम सय्यद, भैय्या कुंभार, मयुर देवी, आतिष दोशी, अजित सोळंकी, अनिल देवी, बंडू दोशी, अशोक मोरे, प्रदिप ढेरे महाराज, जांबुवंत शेळके, पांडुरंग लोंढे, बापु मोहोळकर, नितीन निकम, हर्षद शिंगाडे, नाना अनारसे, दादा देवकर, भैया गोसावी, नितीन कानगुडे, कमलेश दळवी, आप्पा खटके, यांसह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



