-->
करमाळाराजकियसामाजिक

सावडीचे उपसरपंच महेंद्र एकाड यांचे कार्य उल्लेखनीय; आज समाजाला त्यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज- गणेश चिवटे

 

प्रतिनिधी/करमाळा

 

सावडी गाव व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा भाजपाचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले आहे. आज रविवार दि. १३ ऑगस्ट रोजी सावडीचे (ता. करमाळा) उपसरपंच महेंद्र एकाड यांनी स्वखर्चाने करीत असलेल्या दोन रस्त्यांच्या मुरुमीकरण कामांचे शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

 

या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, सावडीचे उपसरपंच महेंद्र एकाड यांनी स्वखर्चातून सावडी ते भराटे वस्ती व भोसले वस्ती ते ननवरे वस्ती या दोन रस्त्यावर मुरूमीकरण केले. या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते होत आहे हे मी माझे भाग्य समजतो. एकाड यांनी स्वखर्चातून केलेले रस्त्याचे काम उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे. समाजाच आपण काहीतरी देण लागतो या उदात्त भूमिकेतून त्यांनी सदरच्या रस्त्यासाठी खर्च केला आहे. समाजाला आज एकाड यांच्या सारख्या नेतृत्वाची गरज आहे.

 

केंद्रात व राज्यात आता भाजपा सरकार आहे. कोणत्याही शासकीय-प्रशासकीय अडी अडचणीसाठी मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे ते म्हणाले. समाजातील प्रत्येक वंचीत शोषित घटकासाठी सरकार अनेक योजना तयार करत आहे. त्याचा लाभ लोकांनी घेतला पाहिजे. कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अडचण येत असल्यास लोकांनी भाजपा कार्यकर्ते किंवा थेट माझ्याशी संपर्क करावा. जेष्ठ नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना, शेतकऱ्यांसाठी सेस फंडातून ५० % अनुदानावर शेती औजारे तसेच बांधकाम कामगारांसाठी ही अनेक योजना आहेत त्याचा लाभ गरजूंनी घ्यावा. असे आवाहन त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले.

 

यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, अमोल पवार, सोमनाथ घाडगे, आदिनाथ सुरवसे, दासाबापू बरडे, भैया गोसावी, पै. अफसर जाधव, संजय किरवे, सागर भराटे, हनुमंत एकाड, विक्रम एकाड, श्रीराम मचले, शरद एकाड यांसह अनेक व ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close