-->
करमाळाराजकिय

आ. संजयमामा शिंदे यांचा गट राजुरीत मजबूत- नंदकुमार जगताप

 

 

वाशिंबे/प्रतिनिधी

 

करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्यामुळे तालुक्यात विकासाचा झंझावात सुरू असून राजुरीत अनेक कामे आमदार मामांच्या माध्यमातून पूर्ण झाली आहेत व अनेक प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे वैयक्तिक स्वार्थापोटी गट सोडून जाताना कोणी गटाला बदनाम करू नये असे आवाहन संजय मामा शिंदे गटाचे समर्थक नंदकुमार जगताप यांनी केले आहे.

 

जो कार्यकर्ता गट सोडून गेला तो मुळातच संजय मामा शिंदे गटाचा निष्ठावंत कधीच नव्हता. काही लोकांच्या दबावाला बळी पडून मतदाना दिवशी सकाळीआठ वाजता गाव सोडून निघून जायचे. जर त्यांच्या मागे ५०० मतदान असेल तर मामांना २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे १८४ व ३२७ एवढेच मतदान का झाले? त्यांच्या वैयक्तिक व्यवहारापायी त्यांनी गट सोडून जाताना गटाची बदनामी करू नये व सामाजिक वातावरण दूषित करू नये असे आवाहनही त्यांनी केले. आजपर्यंत राजुरीच्या इतिहासात झाली नव्हती एवढी मोठी कामे आमदार मामांच्या माध्यमातून पूर्ण झाली आहेत. राजुरीच्या राशीन रोडच्या ओढ्यावरील दोन पुलाचे काम पूर्ण झाले असून तो वाहतुकीसाठी खुला झाला आहे.तसेच राजुरीच्या चढाचे खोलीकरण करून त्याच्या डांबरीकरणाच्या दीड कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली असून ते काम थोड्या दिवसात सुरू होणार आहे. याशिवाय राजुरी ते वाशिंबे या साडेचार कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करताना होणारे अडचण दूर होणार आहे. सभामंडप, हायमास्ट दिवे यासारख्या माध्यमातून कामाचा चढता आलेख आहे.

 

राजुरी तील विजेची मागणी लक्षात घेऊन राजुरीसाठी स्वतंत्र सब स्टेशन निर्मितीचा संकल्प आमदार मामांनी राजुरीचे ग्रामदैवत बाळनाथ महाराज मंदिरात अभिषेक करून सोडला असून लवकरच स्वतंत्र सबस्टेशनला मंजुरी मिळणार आहे. पोंधवडी चारीचे काम युद्धपातळीवर सुरू असून यामुळे राजुरी तलावात कुकडीचे पाणी कायमस्वरूपी सुटणार आहे. यामुळे राजुरी परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. जात, धर्म, आपला, परका या सर्व गोष्टी बाजूला ठेवून मामांनी विकास कामे केल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते विनाकारण या गोष्टीची प्रसिद्धी करत आहेत. असेही त्यांनी सांगितले.

 

काल सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो खरे की खोटे हे राजुरीतील जनतेला माहीत आहे. कारण सकाळी गाडीत बसून सुभाष गुळवे यांची भेट घेण्यासाठी कोण गेले होते?त्यामुळे असा विपर्यास करून लोकांची दिशाभूल करणे थांबवावे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट च्या पार्श्वभूमीवर आमदार संजय मामा शिंदे समर्थक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली असून असल्या गोष्टीकडे लक्ष न देता एकदिलाने आमदार संजय मामा शिंदे यांचे काम अधिक जोमाने करण्याचा निश्चय करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राजुरी येथील विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी आमदार मामांचा लवकरच राजुरी दौरा आयोजित केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

यावेळी राजूरी येथील आ. संजय मामा शिंदे गटाचे कार्यकर्ते आर आर बापू साखरे, सरपंच डॉ. अमोल दुरंदे, नवनाथ दुरंदे, आप्पा साहेब सारंगकर, माजी सरपंच संजय सारंगकर, उदय साखरे, नितीन साखरे, आप्पा साखरे, कल्याण दुरंदे, दादाबापू साखरे आदि मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close