-->
करमाळासामाजिक

जातेगाव-टेंभुर्णी महामार्गाचे खड्डे बुजविण्याचे काम लवकरच पूर्ण होणार- आ. संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचा विषय नेहमीच चर्चेत असतो. या महामार्गाचे हस्तांतरण असो, नव्याने चौपदरीकरण असो किंवा या महामार्गावरती वेगवेगळे अपघात असो हा महामार्ग नेहमीच चर्चेत असतो. सध्या या महामार्गावरती पडलेले खड्डे हा चर्चेचा विषय होता. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे मुरुमाने भुजविण्याचे काम सुरू केलेले असून पावसाळा संपल्यानंतर त्याचे डांबरीकरण केले जाईल अशी माहिती तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता के. एम. उबाळे यांनी पावसामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करता आलेली नाही अशी माहिती दिली. तरी सध्या जातेगाव बाजूकडून खड्ड्यामध्ये मुरूम भरण्याचे काम सुरू आहे. पावसाने पूर्णपणे उघडीप दील्यानंतर सदर खड्ड्यांमध्ये डांबरीकरण केले जाईल असे त्यांनी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close