-->
करमाळाक्रीडाविशेषसामाजिक

गुळसडी येथे विठामाई माध्यमिक विद्यालय व ग्रामस्थांच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण 

 

गुळसडी (ता. करमाळा) येथील विठामाई माध्यमिक विद्यालय व गुळसडी ग्रामस्थ यांच्यावतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) स्पर्धा परीक्षेमध्ये पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल माजी विद्यार्थीनी कु. विद्या किसनराव कळसे व राज्य राखीव पोलीस दल (SRPF) मध्ये मल्हारी लोंढे यांची निवड झाल्याबद्दल तसेच ई. १० वी तील प्रथम, द्वितीय व त्रितीय क्रमांक मिळविलेले विद्यार्थी अनुक्रमे भक्ती भालचंद्र पाटील, आकांक्षा बिभीशन ढमढेरे व शिवानी सोमनाथ खरात या गुणवंत विद्यार्थिनींचा व त्यांच्या पालकांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा सिंधूताई (माई) नारायण खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आला.

 

या प्रसंगी संस्था सचिव मानसिंग भैय्या खंडागळे, सरपंच प्रमोद भंडारे, आदम भाई शेख, दादासाहेब कांबळे, ग्रामसेवक बडे भाऊसाहेब, किसनराव कळसे, धनंजय कळसे, संतोष कळसे आदी ग्रामस्थ तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एम. शिंदे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 

सत्काराला उत्तर देताना नूतन पोलिस उपनिरीक्षक तथा माजी विद्यार्थीनी कु. विद्या किसनराव कळसे यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव मानसिंग भैय्या खंडागळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. एम. शिंदे सर यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सोनवणे सर यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close