-->
करमाळाराजकिय

मकाई सह. साखर कारखान्याच्या चेअरमनपदी दिनेश भांडवलकर यांची बिनविरोध निवड

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी मांगी ऊस उत्पादक गटातून निवडून आलेले नूतन संचालक श्री. दिनेश अंबादास भांडवलकर यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया आज (दि.९) जुलै रोजी कारखाना कार्यस्थळावर निवडणुक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

 

बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल व युवा नेते दिग्विजय बागल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली असून या निवड प्रक्रियेमध्ये मकाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी संचालक दिनेश भांडवलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. या प्रसंगी अनुमोदक म्हणून ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे यांनी तर सूचक म्हणून संचालक सतीश निळ यांनी स्वाक्षरी केली आहे.

 

यावेळी सर्व नूतन संचालक बाळासाहेब पांढरे, अजित झांजुर्णे, रेवणनाथ निकत, आशिष गायकवाड, रामचंद्र हाके, अमोल यादव, संतोष पाटील, नवनाथ बागल, उत्तम पांढरे, दिनकर सरडे, सतिश नीळ, युवराज रोकडे, सचिन पिसाळ, आश्विनी झोळ, कोमल करगळ, अनिल अनारसे, बापू चोरमले उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close