
करमाळा/प्रतिनिधी


करमाळा तालुक्यातील राजुरी येथील श्री. राजेश्वर विद्यालयामध्ये मंगळवार दि. २० जून २०२३ रोजी “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान” व “देणे समाजाचे” या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एकल पालकत्व असलेल्या व कोरोना महामारीच्या काळात पितृ छाया हरवलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी विचारमंचावर कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अनिल झोळ सर, सचिन लोखंडे, अनिल शेंडे, निशिगंधा शेंडे, सुमनताई जाधव, नम्रता शेंडे, अनिल खरात, रत्नाकर तळेकर, मारूती साखरे, अमोल कोल्हे, विजय गरड, जगन्नाथ अवघडे, गंगाराम वाघमोडे सौ. वैशाली तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय साखरे यांनी केले तर आभार रत्नाकर तळेकर यांनी मानले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान व देणे समाजाचे या दोन्ही सामाजिक संस्थेच्या कार्याचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.



