-->
करमाळाराजकिय

शेलगाव (क) येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विहीर खोदकामास प्रारंभ

 

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा तालुक्यातील मौजे शेलगाव (क) येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नवीन विहीर खोदकाम करणे, पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे व वाडीवस्तीसह गावठाण ला पाणीपुरवठा करणे हे काम मंजूर असून त्यासाठी ७१ लाख रुपये निधी मंजूर आहे. यातील विहीर खोदकामास आज प्रारंभ करण्यात आला असून त्याचे भूमिपूजन सरपंच अशोक काटुळे, उपसरपंच सचिन वीर, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन सुभाष पायघन, ग्रा.प. सदस्य नवनाथ जगताप, भरत आप्पा वीर, मेजर शंकर शिंदे, सोसायटी चेअरमन गणेश जाधव, ग्रा.प. सदस्य धर्मराज शिंदे ग्रा.प. सदस्य राहुल कुकडे, माजी ग्रा.प. सदस्य सचिन जगताप, माजी ग्रा.प. सदस्य आजिनाथ वीर या मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

 

या निधी मधून शेलगाव येथील वीर वस्ती नं.१, माळी वस्ती नं.१, पांद, सटवाई व वीर वस्ती नं.२ या वस्त्यांसह गावठाणला पाणीपुरवठा केला जाणार आहे. यानंतर माने वस्ती, माळीवस्ती नं.२ व कुकडे वस्ती या वस्त्यांसाठी टप्पा २ मधून निधी मंजूर झाल्यानंतर कामास प्रारंभ केला जाणार आहे. सदर कामामुळे शेलगाव (क) येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

 

सदर विहीर भूमिपूजन प्रसंगी पांडुरंग कातुरे, राजाराम बापू वीर, आत्माराम वीर, महादेव वीर, आबा दास, संजय वीर, बापू माने, तानाजी वीर, डॉ.विकास वीर, माऊली शिंदे, केशव दास, मयूर वीर, प्रशांत वीर, प्रभाकर वीर, अमोल शिंदे, अंकुश शिंदे, अण्णा शिंदे, सुनील माने, नितीन जगताप, विशाल कातुरे, विठ्ठल शिंदे, दादा शिंदे, निखिल वीर, विशाल वीर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close