-->
करमाळासामाजिक

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने करमाळ्यात आरोग्याचा महायज्ञ; मोफत तपासणी व औषधे दिली जाणार

एन्जोग्राफी अंजी प्लास्ट बायपास सर्जरी सुद्धा ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये मोफत करून देणार

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने करमाळा येथे आरोग्याचा महायज्ञ भरविण्यात आला असून या शिबिरात मोफत ईसीजी तपासणी, मोफत मधुमेह तपासणी, मोफत चष्मे वाटप आदी सेवा मोफत देण्यात येणार आहेत. अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.

या पत्रकार परिषदेस युवा सेना तालुका अध्यक्ष शंभूराजे फरतडे, शहराध्यक्ष विशाल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष मयुर यादव, महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रियंकाताई गायकवाड, माजी शहरप्रमुख संजय शीलवंत, राजेंद्र काळे, संजय भालेराव, पंकज परदेशी, अक्षय परदेशी, राजेंद्र मेरगळ, निलेश चव्हाण, महमद रफिक कुरेशी, संतोष गांगुर्डे, सुरज कांबळे व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मोफत आरोग्य सेवा सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. याच अनुषंगाने करमाळा शहरात रविवार व सोमवार या दोन दिवस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इसीजी तपासणी झाल्यानंतर ज्या रुग्णांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी बायपास ची गरज पडेल, अशा रुग्णांना स्वर्गीय आनंद दिघे हॉस्पिटल, ठाणे येथे मोफत शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे. शिवाय कर्करोगाचे उपचाराची माहिती व नियोजन मोफत करून दिले जाणार आहे. त्याशिवाय रुग्णांची सर्व प्रकारची तपासणी करून ज्या रोगाचे निदान होईल त्या रोगावर उपचार औषधे दिली जाणार आहेत. या ठिकाणी एक हजार रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय आरोग्य संदर्भात सर्व शासकीय योजनांची माहिती देणारा स्टॉल लावण्यात येणार आहे.

 

शिवसेनेचे आज ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या धोरणाप्रमाणे या आरोग्याचा महायज्ञ करमाळा तालुक्यात राबविण्यात येणार असून प्रत्येक रुग्णांना याची मदत दिली जाणार आहे.

करमाळ्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आजपर्यंतची कामे

▪️कोरोना काळात महागड्या २२० रेमेडी सिर इंजेक्शनचे मोफत वाटप करण्यात आले.

▪️तीन महिने रोज चारशे ते पाचशे मजुरांना मोफत जेवण देण्यात आले.

▪️शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून शेकडो रुग्णांना मोफत सेवा देण्यात आली.

▪️रोजगार गेलेल्या जवळपास दोन हजार कुटुंबांना प्रत्येकी एक हजार रुपये किमतीचे किराणा सामानाची कीट देण्यात आले.

▪️आजपर्यंत ३४७ रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून थेट मदतीचे धनादेश मिळवून देण्यात आले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close