-->
करमाळाराजकिय

काँग्रेसच्या राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे तालुकाप्रमुख सोमनाथ काळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

 

करमाळा/प्रतिनिधी

 

भारतीय जनता पार्टीचे माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर हे पोंधवडी येथील कुकडी कॅनॉलच्या चारीची पाहणी करण्यासाठी करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता काँग्रेस आय पक्ष प्रणित राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे प्रमुख सोमनाथ काळे पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांचे नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे.

 

यावेळी बोलताना सोमनाथ काळे म्हणाले की, केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. तसेच तालुक्यातील भाजपाचे नेतृत्व गणेश चिवटे यांच्या कामाला प्रभावित होऊन मी माझ्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. भारतीय जनता पार्टीचे काम करत असताना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजना गणेश भाऊंच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, माजी शहराध्यक्ष संजयअण्णा घोरपडे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, नितीन झिंजाडे, जयंत काळे पाटील, आजिनाथ सुरवसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close