-->
करमाळाविशेष

केत्तुर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

 

केत्तुर/प्रतिनिधी

 

धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त केत्तूर (ता. करमाळा) येथे प्रथमता सकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.

 

तसेच सोमवार दि. १५ मे २०२३ रोजी भव्य निकाली कुस्त्याच्या आखाडा भरवणेत आला. यावेळी केत्तुरचे माजी सरपंच मा. उदयसिंह मोरे – पाटील व उपस्थित मान्यवर याचे हस्ते या कुस्ती आखाड्याचे उद्धाटन करणेत आले. प्रथम कुस्तीचा विजेता समाधान पाटील (उपमहाराष्ट्र केसरी ) हे ठरले. द्वितीय कुस्तीमध्ये सुहास गोडगे (महाराष्ट्र चॅम्पियन) विजेता ठरला असून तृतीय कुस्तीमध्ये शिवशंभु कुस्ती संकुल कंदरचा सतपाल सोनटक्के हा मल्ल विजेता ठरला आहे.

 

या प्रसंगी कुस्ती मैदाना यशस्वी रित्या पार पाडल्या बदद्ल संयोजक समितीच्या वतीने उदय खाटमोडे पाटील यांनी सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशितील कुस्ती शौकिनांचे आभार मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close