
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील मलवडी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा, माजी मंत्री, आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या प्रेरणेतून व जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनात महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे, युवा गाडी जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दादा कोंडलकर तालुका संघटक नामदेव पालवे यांच्या नेतृत्वात व बुधराणी आणि हॉस्पिटलची सर्व डॉक्टरांची टीम यांच्या सहकार्याने मंगळवार दि. १६ मे २०२३ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.
या शिबिरात जवळ जवळ १०० लोकांची तपासणी करण्यात आली. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिये साठी २५ लोकांची निवड ही करण्यात आली. ज्या गरजूंना चष्म्याची गरज आहे त्यांना चष्मे देखील वाटण्यात आले. अशाप्रकारे लोकनायक वंदनीय बच्चुभाऊ कडू यांच्या पावलावर पाऊल ठेवत महिला तालुकाध्यक्ष स्वातीताई यांनी रुग्णसेवेचे व्रत हाती घेऊन लोकांसाठी इथून पुढच्या भविष्यकाळात करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात अशा प्रकारचे शिबिर राबवणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष युवा आघाडी गणेश दादा कोंडलकर, प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे, तालुका संघटक नामदेव पालवे, प्रवीण म्हात्रे, मलवडी सरपंच सौ. बायडाबाई सातव, उपसरपंच साहेबराव दुर्गुळे, ग्रामपंचायत सदस्य लताताई कोंडलकर, कविता पालवे, सुरेखा देडगे यांच्यासह गावातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.



