-->
करमाळामनोरंजनमहिलाविषयक

करमाळा येथील नवभारत इंग्लिश स्कूलमध्ये कथक नृत्यालयाची स्थापना

 

करमाळा/प्रतिनिधी

 

श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कथक नृत्यालयाची स्थापना करण्यात आली. डॉ. वैष्णवी पाटील, डॉ. अपर्णा भोसले, रेश्मा जाधव, आरती दिवाण यांच्या सहकार्यातून कथक नृत्यलयाची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक गणेश भाऊ करे पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेच्या संस्थपिका सुनीता देवी मॅडम, कथक शिक्षिका कांचन पालकर, शिल्पा अंतापुरकर, नरारे सर, मुख्याध्यापिका सुनीता मोहिते मॅडम या होत्या.

 

या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात गणेश करे सर यांनी मानसिक स्वास्थ्य ही व्यवस्थित ठेवण्यासाठी व आनंदी राहण्यासाठी नृत्य हे कसे आवश्यक आहे. तसेच कथक नृत्य किती महत्त्वाचे आहे याबद्दल सांगितले. धनाड्य राष्ट्र म्हणून अमेरिकेकडे पहावे तर संस्कृती पाहताना भारताकडे पहावे असेही ते म्हणाले.

 

करमाळा तालुक्याला सांस्कृतिक माहेरघर बनवण्याचा प्रयत्न नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये सुरू झाला आहे. सत्या पासून सुरू झालेली परंपरा सौंदर्याकडे चाललेली आहे. शास्त्रीय संगीतातील अविभाज्य भाग म्हणून कथक नृत्याला मानले जाते आणि तेच कथक नृत्य आता आपल्या करमाळा येथील नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये आपल्यांना उपलब्ध करून दिले जात आहे याबद्दल कौतुक केले. त्यानंतर कांचन पालकर व शिल्पा अंतापूरकर यांनी सरस्वती वंदना व तराना यांचे अप्रतिम असे सादरीकरण केले.

यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद तसेच विद्यार्थी व पालकवर्ग यांनीही या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close