-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

सीना कोळगाव प्रकल्पाचे उन्हाळी आवर्तन सुरू; आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेले सीना कोळगाव धरण यावर्षी ओहर फ्लो झाले होते. त्यामुळे या धरणाचे पाणी उन्हाळी आवर्तनामध्ये कोळगाव उपसा सिंचन योजनेद्वारे करमाळा तालुक्यासाठी दि. १ मे २०२३ रोजी दुपारी ३:०० वाजता सुरू झाले असल्याची माहिती करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. सदर उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याचा फायदा हा कोळगाव, गौंडरे आदी गावांना होणार आहे.

 

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुका अंतर्गत येणाऱ्या सीना कोळगाव प्रकल्पाची सन २०२२-२३ ची उन्हाळी हंगाम नियोजनाबाबतची कालवा सल्लागार समितीची बैठक दि. २८ फेब्रुवारी रोजी उस्मानाबादचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री ना. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली होती. या बैठकीमध्ये उन्हाळ्यात करमाळा तालुक्याला दोन आवर्तने देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

 

सीना कोळगाव प्रकल्पाचा पाणी सोडण्याचा कार्यक्रम काल कोळगाव प्रकल्प पंप गृह येथे झाला. याप्रसंगी गौंडरे गावचे सरपंच सुभाष हनपुडे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव दौंडे, माजी सरपंच दिनकर सांगडे, भाऊ हनपुडे, ज्योतीराम कापले, ग्रामपंचायत सदस्य कालिदास रणमुडे, उमराव रणमुडे, सदाशिव कोपनर तसेच सीना कोळगाव प्रकल्पाचे शाखा अभियंता कांबळे, चौगुले साहेब आदी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close