-->
करमाळाराजकिय

पुनवर येथील ग्रामपंचायत सदस्यांचा ‘या’ मान्यवरांच्या उपस्थितीत आ. संजयमामा शिंदे गटात प्रवेश

 

करमाळा/प्रतिनिधी

 

भविष्यात पुनवर भागात कायमस्वरूपी पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून हा भाग बागायती करणार आहे. जे करायचे आहे ते चांगल्या पद्धतीने करायचे आहे. तहान लागल्यावर विहीर खोदुन चालणार नाही तर त्यासाठी नियोजनबद्ध काम करावे लागणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेसाठी विश्वासाने काम करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले.

 

शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी सायंकाळी पुनवर (ता. करमाळा) येथील उपसरपंच व ५ ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रसंगी उपसरपंच रोहिदास जाधव, ग्रामपंचायत सदस्य बापूराव नरसाळे, बाळनाथ नरसाळे, पप्पू भिसे, सागर लांडगे, राजेश ननवरे यांच्यासह माजी सरपंच रामहरी जाधव, नितीन जाधव, उमेश ननवरे, सुरेंद्र गोरे, संतोष शेळके, अनिल नरसाळे, कल्याण शेळके आदी कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला.

यावेळी माजी पं.स. सदस्य ॲड. राहुल सावंत, माजी जि.प. सदस्य उध्दवदादा माळी, मांगी सोसायटीचे चेअरमन सुजीत बागल, पत्रकार धनंजय मोरे, गावातील प्रमुख अरुण धुमाळ, पोलीस पाटील बिभीषण नरसाळे, माजी सरपंच दादासाहेब नरसाळे, अशोक नरसाळे, अश्रुभाऊ शेळके, सुग्रीव नरसाळे, बाबासाहेब कोल्हे, सचिन नरसाळे, प्रवेश केलेले सदस्य बाळनाथ नरसाळे, ज्ञानदेव भिसे, उपसरपंच प्रतिनिधी जगन्नाथ जाधव, सागर लांडगे, राजेश ननवरे, बापूराव नरसाळे, कार्यकर्ते अनिल (सर) नरसाळे, अशोक ऊर्फ पिनू नरसाळे, उमेश ननवरे, नितीन ननवरे, संतोष शेळके, रामहरी जाधव, कल्याण शेळके तसेच ग्रामस्थ व तरुण मित्र उपस्थित होते.

यावेळी सुजित बागल म्हणाले की, पुनवर हे मजुरांचे गाव आहे, मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी आले पाहिजे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अविनाश शेलार यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close