-->
करमाळाराजकियसामाजिक

धोकादायक ॲन्टीक्रॅश बॅरियर मुळे अपघात घडल्यास एनपी कन्स्ट्रक्शन कंपनी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू

 

करमाळा/प्रतिनिधी

कोर्टी ते आवाटी रस्ता निर्माण चे काम करणाऱ्या एन पी कन्स्ट्रक्शन कंपनीचा मनमानी व मुजोर कारभार सुरु असुन कंपनीस बटिक झालेले व कंपनीच्या ठेकेदरांच्या एसी गाडीतुन फिरणारे अधिकारी या कंपनीस पाठीशी घालत असल्याने मनमानी कारभारास पाठबळ मिळत आहे त्यामुळे वारवंवार मागणी करून देखील कंपनी मुजोर पणे वागत असुन फिसरे येथे बसवलेले धोकादायक ॲन्टीक्रॅश बॅरियर काढण्यास टाळाटाळ करत आहे.

 या धोकादायक ॲन्टीक्रॅश बॅरियरमुळे अपघात घडल्यास एनपी कन्स्ट्रक्शन कंपनी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू असा इशारा शाहुराव फरतडे यांनी दिला आहे. 

फिसरे ते हिवरे काॅर्नरवर धोकादायक पद्धतीने ॲन्टीक्रॅश बॅरियर बसवल्याने करमाळा बाजुने येताना हिवरे काॅर्नर चा अंदाज येत नसल्याने हे ॲन्टीक्रॅश बॅरियर आणखी आतल्या बाजुने लावावेत व भराव्याची उंची वाढवावी तसेच हिवरे बाजुस काढलेल्या फॅनची आणखी डांबरीकरण करावे , काम चालु असताना काॅर्नरवर लावलेला गांवाची दिशा दर्शक अंतर दाखवणारा फलक पुर्ववत बसवणे गरजेचे आहे. मात्र वारंवार तोंडी व लेखी मागणी केल्यानंतर केवळ आश्वासन दिले जात आहे.

 

अगोदरच हा काॅर्नर अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जात आहे व सध्या चुकीच्या पद्धतीने ॲन्टीक्रॅश बॅरियर बसवल्याने हे वळण अधिकच धोकादायक बनले आहे मात्र सुचना करुन देखील प्रशासन व कंपनीकडून डोळेझाक पणा केला जात आहे भविष्यात दुर्दैवाने अपघात घडल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता कुंडलिक उबाळे व एनपी कन्स्ट्रक्शन कंपनीवर शिवसेनेच्या वतीने गुन्हे दाखल करू असा इशारा फरतडे यांनी दिला आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close