
वाशिंबे/प्रतिनिधी


करमाळा तालुक्यातील वाशिंबे ग्रामपंचायतीच्या वतीने सन २०२२-२३ चा ५ टक्के अपंग कल्याण निधीचे व १५ टक्के दलित सुधारणा निधीचे वाटप लोकनियुक्त सरपंच तानाजी (बापू) झोळ, उपसरपंच अमोल पवार, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, धोंडीराम कळसाईत, शिवराज झोळ, ग्रामसेवक टी. एस येडे भाऊसाहेब, मधुकर टापरे, नामदेव बोबडे शरद शिंदे, हनुमंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना सरपंच तानाजी (बापू) झोळ म्हणाले की, या निधीचे वाटप आपण दरवर्षी करणार असल्यामुळे सर्व अपंग व वंचित घटकांना याचा लाभ मिळणार आहे. यावेळी अपंगांसाठी सहा हजार रुपयांचा धनादेश व वंचित घटकांसाठी पंख्याचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी अशोक ननवरे, देविदास राऊत, रणजित जगदाळे आदींनी परिश्रम घेतले.




