-->
करमाळासामाजिक

वृक्षारोपण करून पुनवर येथील युवक मयूर सावंत यांचा वाढदिवस साजरा

वाढदिवसा दिवशी वृक्षारोपण करून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ केक कापून किंवा पार्टी न करता समाजास उपयुक्त ठरेल असे कार्य केले पाहिजे, या उद्देशाने पूनवर (ता. करमाळा) येथील युवक, सामाजिक कार्यकर्ते मयूर सावंत व त्यांच्या मित्रमंडळींनी वृक्षारोपण करून एक सकारात्मक उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

 

मयूर सावंत यांनी आज शनिवार दि. ७ जून रोजी सायंकाळी ५:३० वा. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुनवर गावातील क्रिकेट मैदानाच्या परिसरात झाडे लावली. त्यांच्या सोबत मित्रपरिवारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी मिळून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.

 

सध्याच्या काळात वाढते प्रदूषण आणि जंगलतोड लक्षात घेता अशा सामाजिक उपक्रमांना खूप महत्त्व आहे. मयूर सावंत यांनी दिलेला पर्यावरण संवर्धनाचा हा संदेश निश्चितच सर्वांना प्रेरणादायी ठरेल.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close