
करमाळा/प्रतिनिधी


डिजिटल मीडिया संपादक संघटना महाराष्ट्र व मानवता संयुक्त संघ यांच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल करमाळा येथील सा. पवनपुत्र चे संपादक, डिजिटल मीडिया संपादक संघाचे करमाळा तालुकाध्यक्ष, पत्रकार दिनेश मडके यांचा आदर्श पत्रकार म्हणुन गौरव करण्यात आला.
या सत्कार समारंभा प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने, जिल्हा परिषद मुख्य लेखाधिकारी अजयसिंह पवार, डॉ. विजयकुमार केसकर, मानवता संयुक्त संघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विजय थोरात, डिजिटल मीडियाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार कोरे, मानवता संयुक्त संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वजीत देशमुख, डिजिटल मीडियाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार कोरे, सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत कटारे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकार दिनेश मडके यांचा शाल, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



