करमाळ्यात खत विक्रेत्यांचा कडकडीत बंद; ‘या’ तक्रारीं विषयी दिले तहसीलदारांना निवेदन
लिंकिंग कंपन्यांनी पोचमाल न देणे व हमाली विषयक आहेत तक्रारी

करमाळा/प्रतिनिधी


करमाळा तालुक्यातील रासायनिक खत विक्रेते, कीटकनाशके आणि बियाणे विक्रेते असोसिएशनच्या वतीने संपूर्ण करमाळा तालुक्यातील ७५० दुकाने आज पासून बेमुदत संपावर गेली आहेत. खताच्या कंपन्याकडून होणारे अतिरिक्त लिंकिंग खते कंपन्या पोच देत नाहीत. तसेच हमाल व माल वाहतूकदार यांच्या कडून होणारी अडवणूक या प्रश्नासाठी बेमुदत संप पुकारला आहे.
रासायनिक खत कंपन्या इतर अनुदानित खतासोबत जैविक खते व इतर प्रोडक्ट व्यापाऱ्यांच्या गळ्यात घालतात. मात्र शेतकऱ्यांना ही खते विकता येत नाहीत. यातून शेतकरी व विक्रेत्यात वाद होऊन तक्रारी वाढत आहेत. युरिया खताची अधिकतम विक्री किंमत २६६ रूपये आहे. मात्र व्यापाऱ्यांना अनेक वेळा हे खत वाहतूक करून आणावे लागते. व्यापाऱ्यांना या खताचे पोते ३०० रुपये पर्यंत येते, पण २६६ रुपये विक्री किंमत असल्यामुळे ते विकणे अशक्य होते.
२६ जानेवारी २०२३ रोजी करमाळ्यात अचानक हमालांनी काम बंद केल्यामुळे ३०० मॅट्रिक टन खत परत गेले. कुर्डूवाडी, पंढरपूर, बारामती रेल्वे पॉईंटहून आलेल्या सर्व ट्रक रखडल्यामुळे नंतरचे खत आले नाही. यामुळे आता करमाळा तालुक्यातील बाजारातील खताची उपलब्धता कमी होणार आहे.
यावेळी करमाळा खते विक्रेते, बी- बियाणे असोसिएशनचे अध्यक्ष महेश चिवटे, प्रशांत नेटके, राजकुमार जोशी, सोमनाथ शिंदे, शितल गांधी, महावीर सोळंकी, प्रविण कोठावळे, संतोष दोशी, आदीत्य दोशी, सुमित सरडे, शैलेश गरड, कृष्णा सरडे, सुरेश सरडे, सचिन बिनवडे, सागर नाळे, गणेश सानप, विशाल जायभाय, राजेंद्र मेरगळ, विलास जाधव, वैभव वीर, सचिन सुरवसे, प्रताप जाधव, गणेश फुले, किरण गायकवाड, अभिजीत बदे, अक्षय घाडगे, जितेंद्र मिसाळ, नयन रोकडे, धनजंय राऊत, लक्ष्मण भोसले, विशाल मस्कर, गणेश नलवडे, कांतीलाल कटारिया, प्रदीप देवी, रोहित दोशी, धनंजय राऊत, प्रितम राठोड, सागर गायकवाड, सोनु होनमाने, वैभव मावलकर, लक्ष्मण भोसले, विशाल मस्कर, सागर बोराडे, प्रशांत केकान, नागेश चेंडगे, मिलिंद चव्हाण आदी उपस्थित होते.
खत विक्रेत्यांच्या संदर्भात कामगार आयुक्त यांना पत्र व्यवहार केला असून लवकरच याबाबत कामगार आयुक्त, वाहतूकदार, हमाल व व्यापारी यांचे प्रश्न सोडतील.
मा.श्री. समीर माने, तहसीलदार करमाळा.
करमाळ्यात पाठवलेल्या खताच्या गाड्या लवकर खाली होत नाहीत, त्या मुद्दाम रखडवल्या जातात. यामुळे आता करमाळ्याला खत पाठवायचे का नाही याचा विचार करावा लागेल.
दत्ता काकडे अध्यक्ष, मालट्रक वाहतूकदार संघ,कुर्डूवाडी
२६ जानेवारीला अचानक बंद झाल्यामुळे रासायनिक खत मिळाले नाही. शेतीतली कामे रखडली गेली, मजुरी वाया गेली, याला जबाबदार कोण ? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.



