
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचा करमाळा मतदार संघात “आमदार आपल्या दारी, विकासावर बोलू काही” या उपक्रमांतर्गत गावभेट दौरा सुरू आहे. रविवार दि. २९ जानेवारी रोजी त्यांनी सौंदे, शेलगाव क.,अर्जुननगर, मिरगव्हाण, फिसरे, हिसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव(ह.), गौंडरे या १०गावांमध्ये दौरा केला.
याप्रसंगी निमगाव (ह.) येथील नागरिकांचा उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला, ग्रामस्थांनी मनमोकळेपणाने विविध सामाजिक व वैयक्तिक अडचणी मांडल्या, त्यावर मामांनी समाधानकारक उत्तरे देऊन अडचणी सोडवण्याची आश्वासन दिले.

तसेच ॲडिशनल भगीरथ रोहित्र, गावांतर्गत सिमेंट रस्ते, वस्तीसाठी रस्ते व खडीकरण आदी मागण्या करून विविध कामांसाठी आ. शिंदे यांना निवेदन दिले.
चालू वर्षात मामांकडून व त्यांच्या शिपरशी ने आतापर्यंत गावाला ३.५० कोटी निधी मिळाला आहे व यापुढेही निधी मिळत राहील व गावाचा विकास होत राहील असे मनोगत माजी जि.प. सदस्य नानासाहेब नीळ सर यांनी व्यक्त केले.
यावेळी विवीध क्षेत्रातील मान्यवर व समस्त ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.



