-->
करमाळाराजकियसामाजिक

रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत बैठक लावण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना; जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची माहिती

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा तालुक्यातील तीस हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आणणारी रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावावी. यासाठी करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे दीपक पाटणे, जिल्हाप्रमुख चरण चवरे यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी अधिकाऱ्यांची बैठक बोलवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

 

आरोग्य मंत्री प्रा. तानाजीराव सावंत, शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, माजी आमदार नारायण आबा पाटील, देवानंद बागल, करमाळा तालुक्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यासह लवकरच मंत्रालयात या विषयावर बैठक होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी

दिली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close